बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
![]() |
बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती Bēgama hajarata mahala rāṣṭrīya śiṣyavr̥ttī |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनालय (योजना) - बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती | Begama hajarata mahala rāṣṭrīya śiṣyavr̥ttī राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बाँध, शीख, पारसी व जैन या अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या इयत्ता ९ वी ते १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक मुलींसाठी केंद्र शासनाची बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती हि योजना पूर्वी अल्पसंख्याक मुलींसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती म्हणून ओळखत जात होती आणि ती ०३/०५/२००३ रोजी भारताचे तत्कालीन मा. पंतप्रधान यांनी सुरु केली होती.
सदर योजनेमधून अल्पसंखाक समाजातील इयत्ता ९ वी व १० वी च्या मुलींना वार्षिक रुपये ५,०००/- व इयत्ता ११ वी व १२ वी मधील मुलींना वार्षिक रुपये ६,०००/ शिष्यवृत्ती देण्यात येते.
सन 2022-23 या वर्षांसाठी इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थीनींनी केवळ ऑनलाईन पध्दतीने फक्त नवीन मधून दि. 15/11/2022 पर्यंत www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरावयाचे आहेत.
शिष्यवृत्ती पात्रतेच्या अटी व शर्ती
- सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासनमान्यताप्राप्त असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणान्या अल्पसंख्याक समाजातील इयता ९ वी ते १२ वीच्या मुलींसाठी ही । योजना लागू आहे.
- अर्जदार विद्यार्थीनींना मागील वर्षी ५० टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेली असावी.
- पालकाचे (कुटूंबाचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाखापेक्षा कमी असावे.
- पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकान्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील २ पेक्षा जास्त विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिळणार नाही.
- अर्ज भरताना विद्याथ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बैंक व आधार माहिती अचूक भरावी.
- धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधारकार्ड / आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करावीत.
- या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थीनींनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
शाळेसाठी सर्वसाधारण सूचना
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज व कागदपत्रे वर्ग निहाय व वर्ष निहाय किमान ५ वर्ष जतन करुन ठेवणे.
- ज्या शाळा बंद झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही किवा शाळेस शासनाची मान्यता आहे परंतू वर्गास मान्यता नाही अशा
- संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारु नये तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग नसतानाही त्या वर्गामधून अर्ज प्राप्त झाल्यास असे सर्व अर्ज रिजेक्ट किंवा फेंक मार्क करावे.
- शाळा स्तरावरुन विद्याथ्र्यांचे अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत तसेच विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी. शाळास्तरावरती एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व अजांमधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विद्यार्थ्यास एक संधी देण्यात यावी. यासाठी अर्ज डिफेक्ट करावा. विद्यार्थ्यास संधी देऊनही माहिती चूकीची भरल्यास अर्ज रिजेक्ट करण्यात यावा. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा अर्ज बनावट आढळल्यास अर्ज फेकमार्क करण्यात यावा.
- शाळांचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांची माहिती आधार नुसार माहिती NSP २.० या पोर्टलवरती भरण्यात यावी.
- सन २०१५-१६ पासून शिष्यवृत्तीचे वितरण केंद्रशासनामार्फत लाभाथ्र्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Beneficiary Transfer) Mode द्वारे करण्यात येत आहे.
सर्वसाधारण सूचना
- सन २०२१-२२ मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या / शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणान्या सर्व विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ करिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी नूतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
- नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल तसेच एका विद्यार्थ्याने नवीन / नूतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील.
- विद्याव्यांचे बैंक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे, नसल्यास पालकांचे राष्ट्रीयकृत बैंक खात्याची माहिती अर्जात भरता येईल.
- विद्याथ्यांचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0) (www.scholarsitis.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकाची राहील.
- बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यावृतीसाठी प्रत्येक वर्षी अर्ज नवीन मधून भरायचा आहे. पोर्टलवर विद्यार्थाचे अर्ज कोणत्याही एका शिष्यावृतीसाठी भरण्यात यावा.
- (टीप :- हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे.)
- अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा क्रमांक पालकांचा असेल तर तो ०२ पाल्यांसाठीच वापरता येईल.
- ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी आल्यास वेबसाईटच्या Home Page वरील Frequently Asked Questions (FAQ) चा वापर करावा.
इतर महत्वाच्या शिष्यवृत्ती...
- अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती | Pre-matric Scholarship Scheme
- बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
- PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI)
- विद्याधन शिष्यवृत्ती करिता अर्ज सुरु | Vidyadhan Scholarship 2022
- टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती | Tata Trust Scholarship
- राष्ट्रीय आर्थिकदुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरणेबाबत.
Please do not enter any spam link in the comment box.