-->
1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24

NMMS Exam - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022-23

NMMS Exam महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS Exam) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्याथ्यांसाठी रविवार दिनांक 21 डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिद्धी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात येते.

NMMS Exam - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022-23

NMMS Exam
NMMS Exam

NMMS Exam 2022-23  ही 21 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. NMMS Exam 2022-23 बाबतचे शासन परिपत्रक डाउनलोड करा.
NMMS Exam 2022-23 Form राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२2-२3 ही 21 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. त्यासाठी आवेदनपत्रे भरण्यास 10 ऑक्टोबर पासून सुरुवात करणेबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

NMMS Exam २०२२-२३ - सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे NMMS Exam या योजनेचे उद्दिष्ट आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर NMMS Exam  शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

"National Scholarship Scheme for Economically Weaker Students" NMMS Exam 2022-23

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा "NMMS Exam" २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी विवार दिनांक 21 डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.

अर्ज - दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

NMMS एक्झाम अर्ज करण्याची पध्दत | NMMS Exam Application Procedure

अर्ज - दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

NMMS परीक्षा पात्रता | NMMS Exam Eligibility

A. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
B. पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
C. विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
D. खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
  • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
  • शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
  • सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी

विद्यार्थ्यांची निवड

विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

NMMS परीक्षेचे वेळापत्रक | NMMS Exam Timetable

महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

NMMS Exam
NMMS Exam Timetable
सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

NMMS EXAM साठी विषय | Subject for NMMS exam

सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

A. बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
B. शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५) ३. गणित (एकूण गुण - २०) असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
A. सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
B. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
C. गणित २० गुण.

NMMS EXAM साठी माध्यम | Medium for nmms exam 

प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील.(सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

NMMS Exam करिता आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या 

अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोठयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्याथ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल, जिल्हयासाठीचा कांठा व विद्याथ्र्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्याथ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात "येतील,

NMMS Exam शुल्क | NMMS Exam Fee

परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

NMMS Exam
NMMS Exam fee 2022-23

NMMS परीक्षेचा निकाल घोषित करणे | NMMS Exam result

सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

NMMS Exam शिष्यवृत्ती दर | NMMS Scholarship Rate

शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास ५ वर्षांसाठी दरमहा रु.१,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
  • शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वीतून इ. १०वी व इ. ११ वीतून इ. १२ वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.
  • इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)
  • सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा  प्रश्नपत्रिका संच (इयत्ता 8 वी)

NMMS Exam अनधिकृततेावत इशारा

मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.
💣


💣


www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

8 seconds remaining
Skip Ad >
×