1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी Maha Student App द्वारे

Maha Student App शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळाच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित Maha Student App सुविधा उपलब्ध.

राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी Maha Student App द्वारे

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डीजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGI (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळाच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने Maha Student App द्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

यानुसार विभागामार्फत Maha Student App हे  विकसित करण्यात आले आहे. सदर Maha Student App हेगुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या Maha Student App मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या आधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही क्लिक सरशी नोंदविता येणार आहे. याचसोबत शाळेमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर "Maha Student App" मुळे शिक्षकांना विद्याथ्र्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही यासाठी आवश्यक असणारे दोन्ही अॅपचे एकत्रीकरण करण्यात येईल. "Maha Student App" यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिक्षकांची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.

तरी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने 'Maha Student App' द्वारे भरून घेण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय क्रमांका संकिर्ण-२०२०/प्र.क्र.२०३ / एस.डी.-४ सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२१११०३१७२८५५४४२१ असा आहे. 

Maha Student App Download

Download Maha Student App

Maha Student App मोबाईल ऍप्लिकेशन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, सरकारसाठी विकसित केले आहे. महाराष्ट्राचा. SARAL पोर्टलवरील शाळेतील विशिष्ट इयत्ता आणि विभागासाठी नियुक्त केलेले शिक्षक MahaStudent मोबाइल अॅप वापरून नोंदणी करू शकतात. कॅटलॉगमधील विद्यार्थ्यांना दैनंदिन उपस्थिती जमा करण्यासाठी तसेच परीक्षेचे गुण भरण्यासाठी मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

MahaStudent App अंतर्गत पर्याय उपलब्ध आहेत

• दैनंदिन उपस्थिती जमा करणे -

कॅटलॉगमधील विद्यार्थी निवडलेल्या इयत्तेसाठी आणि विभागासाठी सूचीबद्ध केले आहेत. शिक्षक निवडलेल्या वर्तमान तारखेसाठी अनुपस्थित विद्यार्थ्याला चिन्हांकित करतात आणि उपस्थिती सबमिट करतात.

हजेरीसह ठिकाण आणि वेळ संग्रहित केली जाते.

• परीक्षा गुण भरणे -

शिक्षक विद्यार्थ्यांना परीक्षेला अनुपस्थित घोषित करतात.

शिक्षक परीक्षेचा प्रकार निवडतो आणि विशिष्ट विद्यार्थी निवडून प्रश्ननिहाय गुण देतो. गुण भरण्यासाठी कनेक्टिव्हिटी आवश्यक नाही. टास्क पूर्ण केल्यानंतर, सिंक टू सर्व्हर पर्याय SARAL वर गुण सबमिट करतो.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र निकषावर आधारित उपस्थिती आणि प्रगत/अप्रगत विद्यार्थ्यांचे अहवाल.
वैशिष्ट्ये -

• SARAL ( ), शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग ई-गव्हर्नन्स प्रकल्पासह एकत्रित

• शाळेच्या स्थानापासून विनिर्दिष्ट मर्यादेत सादर केलेली दैनिक उपस्थिती, शिक्षकांची उपस्थिती सुनिश्चित करणे

• कनेक्टिव्हिटी फक्त सर्व्हरशी समक्रमित करण्याच्या बिंदूवर आवश्यक आहे.

• विद्यार्थ्यांच्या संख्येशी जुळण्यासाठी मोबाइलवर विद्यार्थी कॅटलॉग ऑटो रिफ्रेश करा.

• आवृत्ती नियंत्रण सक्षम.

राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी Maha Student App द्वारे
राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी Maha Student App द्वारे

महत्त्वाचे- आपल्याकरिता अधिक महत्वाची माहिती मिळविण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Please do not enter any spam link in the comment box.

Top Post Ad

{Below Post Ad}

×