1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

मा. राष्ट्रपती तसेच मा. पंतप्रधान यांचे छायाचित्र शासकीय / निमशासकीय कार्यालयात लावण्याचा शासन निर्णय

शासकीय / निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत - Present in Government / Semi-Government Office  President Shri.  Regarding the display of Draupadi Murmu's photo......

मा. राष्ट्रपती तसेच मा. पंतप्रधान यांचे छायाचित्र शासकीय / निमशासकीय कार्यालयात लावण्याचा शासन निर्णयशासन निर्णय 

मा. राष्ट्रपती तसेच मा. पंतप्रधान यांचे छायाचित्र शासकीय / निमशासकीय कार्यालयात लावण्याचा शासन निर्णय
मा. राष्ट्रपती तसेच मा. पंतप्रधान यांचे छायाचित्र
शासकीय / निमशासकीय कार्यालयात लावण्याचा शासन निर्णय

शासन निर्णय

१. विद्यमान मा. राष्ट्रपती तसेच मा. पंतप्रधान यांचे छायाचित्र शासकीय / निमशासकीय कार्यालयात लावण्याच्या संकेतानुसार मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे शासनाने विहीत केलेल्या १६" x २२" आकाराचे रंगीत छायाचित्र मा. मुख्यमंत्री, मा. मंत्री मा. राज्यमंत्री यांची दालने तसेच सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांमधून लावण्यात यावे, असे या शासन निर्णयान्वये सुचित करण्यात येत आहे.

२. मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र मध्यवर्ती शासकीय मुद्रणालय मुंबई / नागपूर / पुणे / औरंगाबाद / कोल्हापूर यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित विभाग/ कार्यालये यांनी संबंधित शासकीय मुद्रणालयाकडे संपर्क साधावा. शासकीय मुद्रणालयांनी मागणीनुसार छायाचित्राचा पुरवठा करावा.

३. सर्व मंत्रालयीन विभागांना सुचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार छायाचित्राची प्रत संबंधीत शासकीय मुद्रणालयातून प्राप्त करणेबाबत व छायाचित्राची चौकट (फ्रेम) करून कार्यालयांमधून प्रदर्शित करण्याबाबत सूचना द्याव्यात. छायाचित्र व चौकट (फ्रेम) प्रित्यर्थचा खर्च संबंधीत शासकीय विभाग / कार्यालयांना मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागवावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०९३०१४५६४५८१०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

rashtrapati-pantapradhan-foto-shaskiy-nimshaskiy-karyalayat-lavane-shasan-nirnay राष्ट्रपती-पंतप्रधान-छायाचित्र-बाबतचा-शासन-निर्णय

  • विद्यमान मा. राष्ट्रपती तसेच मा. पंतप्रधान यांचे छायाचित्र शासकीय / निमशासकीय कार्यालयात लावण्याच्या संकेतानुसार काय आहे शासनाने विहीत केलेल्या आकार?
  • छायाचित्र कोणामार्फत व कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे?
  • छायाचित्र व चौकट (फ्रेम) प्रित्यर्थचा खर्च कसा भागवावा?

जाणून घ्या संपूर्ण माहिती



हे देखील पहा



www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

💢


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×