अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती | Pre-matric Scholarship Scheme 2022-23
![]() |
अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती Pre-matric Scholarship Scheme 2022-23 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनालय (योजना)- अल्पसंख्याक प्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ही अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकारद्वारे पुरस्कृत योजना आहे. सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातंर्गत संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शासकीय वा खाजगी शाळेत इ. १ ली ते १० वी मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १.०० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून, मागील वर्षात विद्यार्थ्यांनी ५०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
Alpasankhyank Pre-Matric Scholarship Shishyvruti
अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौध, शीख, पारसी व जैन या अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या इयत्ता 1ली ते 10वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून सुरु आहे. सन 2022-23 या वर्षांसाठी इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन पध्दतीने नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांनी दि. 15/11/2022 पर्यंत www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरावयाचे आहेत.
शिष्यवृत्ती पात्रतेच्या अटी व शर्ती
- इयत्ता १ ली ते १० वीच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासनमान्यताप्राप्त असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही लागू आहे.
- अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी ५० टक्के पेक्षा जास्त गुणाने उतीर्ण झालेला असावा.
- पालकाचे (कुटूंबाचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे.
- पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील २ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.
- अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बँक व आधार माहिती अचूक भरावी.
- धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधारकार्ड/ आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करावीत.
- ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्याथ्र्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तींचा लाभ घेतलेला नसावा.
- एकूण पात्र विद्याथ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनीसाठी राखीव आहे...
- विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वसतीगृहात राहत असतील अथवा राज्यशासनाच्या वसतीगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतीगृहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात. तसेच वसतिगृहामध्ये भरलेले शुल्काचा पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे.
नवीन (फ्रेश) विद्यार्थ्यांना धर्मनिहाय शिष्यवृत्ती कोटा
शिष्यवृत्ती दर
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- विद्यार्थ्याचा फोटो
- आधार कार्ड / आधारकार्ड स्कॅन केलेली कॉपी
- मागील वर्षाचे गुणपत्रक- विद्यार्थ्याला मागील वर्षी किमान ५०% गुण असावेत.
- उत्पन्नाचा दाखला - उत्पन्नाचा दाखला मा. तहसीलदार यांचा 1 लाखाच्या आतमधील असावा.
- स्वयंघोषित उत्पन्नाचा दाखला
- स्वयंघोषित धर्माचा दाखला
- शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक आणि बँक शाखेचा आयएफएससी कोड, विद्यार्थी बॅंक पासबूक झेरॉक्स / पासबूक स्कॅन केलेली कॉपी
- विद्यार्थ्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांसाठी मुदत - 15/11/2022 पर्यंत फॉर्म भरता येतील.
शाळांसाठी मुदत - 30/11/2022 पर्यंत शाळांना फॉर्म व्हेरिफिकेशन करता येतील.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी डायरेक्ट लिंक?
- नवीन New - Link
- नुतनीकरण Renewal - Link
- Pre-matric Scholarship Scheme Guidelines (new)
- FAQs
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म कसे भरावेत ?
Scheme Details
The scholarship at pre-matric level will encourage parents from minority communities to send their school going children to school, lighten their financial burden on school education and sustain their efforts to support their children to complete school education. The scheme will form the foundation for their educational attainment and provide a level playing field in the competitive employment arena. Empowerment through education, which is one of the objectives of this scheme, has the potential to lead to upliftment of the socio economic conditions of the minority communities.
alpasankhyank-pre-matric-scholarship-shishyvruti
सबका विकास महाक्विझ | Sabka Vikas Mahaquiz
इतर महत्वाच्या शिष्यवृत्ती...
- अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती | Pre-matric Scholarship Scheme
- बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
- PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI)
- विद्याधन शिष्यवृत्ती करिता अर्ज सुरु | Vidyadhan Scholarship 2022
- टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती | Tata Trust Scholarship
- राष्ट्रीय आर्थिकदुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरणेबाबत.
Please do not enter any spam link in the comment box.