इ.| इयत्ता | 10 वी | 12 वी | दहावी | बारावी | 10th | 12th | exam | fee | will | be | refunded | maharashtra | ssc | hsc | board | Refund | of | Examination | Fee | For |10th | 12th | Board | Exam | फी | परत | मिळणार | माफ | माफी
दहावी-बारावीचे परीक्षा फी परत मिळणार, कसे मिळवाल? येथे जाणून घ्या
कोरोनाच्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी बाेर्डाची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला होता. त्यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी भरलेल्या या दाेन्ही परीक्षांची फी माफी करून अंशत: परत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रकामार्फत फी परत मिळणार या संदर्भातील माहिती दिली आहे.
Refund of Examination Fee For 10th-12th Board Exam
परीक्षा फी माफी यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. परीक्षा फी माफी करिता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता 10 वी व इयत्ता विद्यार्थ्यांचा तपशील शुक्रवारी (१२ नाेव्हेंबर) सकाळी ११ वाजेपासून मंडळाच्या mahasscboard.in संकेतस्थळावरून दहावीसाठी https:/feerefund.mh-ssc.ac.in व बारावीसाठी https:/feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरील लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी "फी परत मिळणार" या करिता नोंदणी करावी, असे मंडळाच्या सचिवांनी कळविले आहे.
असे आहे परिपत्रक...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन २०२१ मधील इ. १० वी व इ. १२ वी च्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड-१९ च्या प्रादुर्भावामूळे) रद करण्यात आली. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ१२वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशतः करण्यात येत आहे. यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक १२/११/२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून मंडळाचे १) इ. १० वी व १२ वी साठी mahasscboard.in २) इ. १० वी साठी https:/feerefund.mh-ssc.ac.in व ३) इ. १२ वी साठी https:/feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून लिंकल्दारे नोंदविणे आवश्यक आहे. सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी याबाबत नोंद घ्यावी.
दहावी-बारावीचे परीक्षा फी परत मिळणार, कसे मिळवाल? येथे जाणून घ्या |
Please do not enter any spam link in the comment box.