1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

SLAS - राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण

राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय संपादनूक सर्वेक्षण SLAS चे आयोजन दिनांक 17 मार्च 2023 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण चाचणीचे स्वरूप, दिनांक व  वेळ पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.

SLAS - राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण
SLAS - राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण

राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण (SLAS) 2023

सदर सर्वेक्षण हे मराठी माध्यमासाठीच्या शाळांमध्ये होणार असून प्रथम भाषा मराठी व गणित या दोन विषयांमधील अध्ययन निष्पत्ती वर आधारित असणार आहे. 

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले होते राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॅशनल सर्वेक्षण अर्थातच न्यास NAS करण्यात आले होते त्यानंतर आता मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यस्तरीय अध्ययन संपादन  सर्वेक्षण शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे राज्यातील तिसरी पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांचे स्लॅश च्या आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत मार्चच्या तिसऱ्या होणार आहे हे सर्वेक्षण मराठी माध्यमांच्या प्रथम भाषा मराठी व गणित विषयाचे करण्यात येणारे राज्यातील इयत्ता तिसरीच्या 3756 पाचवीच्या 4050 तर आठवीच्या 4127 शाळांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणाऱ्या राज्यातील एकूण 11933 शाळांमध्ये सर्वेक्षण केली जाणार आहे सर्वेक्षणाचे अनुषंगाने निवडण्यात आलेल्या शाळेचा पट माध्यम यांची पडताळणी करून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी महानगरपालिका स्तरावर शिक्षणाधिकारी आणि संबंधित तालुका समन्वयक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. SLAS राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण

स्लॅश सर्वेक्षणाचा उद्देश

असल्यास सर्वेक्षणात तिसरी पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी भाषा विषय आणि गणित यासंबंधी विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासले जाणार आहे त्यात विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेणे विद्यार्थ्यांच्या अडचणीवर समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे असल्यास मध्ये जिल्हा परिषद शासकीय महानगरपालिका सरकारी अनुदानित प्राप्त शाळा सहभागी होणार आहेत जिल्हा नियायक शाळा औरंगाबाद 572 अकोला 192 अमरावती 337 औरंगाबाद 496 भंडारा 163 बीड 437 बुलढाणा 359 चंद्रपूर 304 धुळे 229 गडचिरोली 159 गोंदिया 186 हिंगोली 219 जालना 356 जळगाव 493 कोल्हापूर 497 लातूर 378 मुंबई 99 उपनगर 95  नागपूर 344  नांदेड 593  नंदुरबार 209 नाशिक 678 उस्मानाबाद 266 पालघर 339 परभणी 323 पुणे 712 रायगड 229 17 रत्नागिरी 140 सांगली 387 सातारा 383 सिंधुदुर्ग 95 सोलापूर 573 ठाणे 363 वर्धा 156 वाशिम 183 यवतमाळ 477 एकूण 11933

इयत्ता तिसरी

प्रथम भाषा प्रश्न संख्या २० गणित विषय प्रश्न संख्या २५ एकूण प्रश्न संख्या ४५ सर्वेक्षण चाचणी सोडविण्याचा कालावधी ९० मिनिटे दिनांक व वेळ दिनांक १७ मार्च २०२३ शालेय कामकाजाच्या वेळेत

इयत्ता पाचवी

प्रथम भाषा प्रश्न संख्या २० गणित विषय प्रश्न संख्या २५ एकूण प्रश्न संख्या ४५ सर्वेक्षण चाचणी सोडविण्याचा कालावधी ९० मिनिटे दिनांक व वेळ दिनांक १७ मार्च २०२३ शालेय कामकाजाच्या वेळेत

इयत्ता आठवी

प्रथम भाषा प्रश्न संख्या २५ गणित विषय प्रश्न संख्या ३५ एकूण प्रश्न संख्या ६० सर्वेक्षण चाचणी सोडविण्याचा कालावधी १२० मिनिटे दिनांक व वेळ दिनांक १७ मार्च २०२३ शालेय कामकाजाच्या वेळेत

राज्य अध्ययन संपादमुख सर्वेक्षण SLAS च्या अनुषंगाने शाळा महाविद्यालय मुख्याध्यापक शिक्षण यांना द्यावयाच्या सूचना SLAS राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण

  1. दिनांक 17 मार्च 2023 रोजी राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षण असल्यास करण्यात येणार आहे. 
  2. सदर सर्वेक्षण इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गाची करण्यात येणार आहे. 
  3. सदर सर्वेक्षण हे तणावमुक्त वातावरणात घेण्यात येईल याची काळजी घ्यावी.
  4. सदर सर्वेक्षण म्हणजे परीक्षा नाही यातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती मध्ये संपादनूक स्थिती जाणून घेतली जाणार आहे. तसेच विद्यार्थि नीहाय गुण कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाहीत.
  5. इयत्ता तिसरी ,पाचवी ,आठवीची वर्ग असलेल्या शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने राज्यस्तरावर निवडण्यात आलेल्या आहेत.
  6.  कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेली आहे हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांचे कडून जाहीर करण्यात येईल.
  7. यामध्ये जिल्हा परिषद ,महानगरपालिका ,नगरपालिका, नगरपरिषद ,नगरपंचायत, खाजगी अनुदानित ,आदिवासी विभाग ,समाज कल्याण ,कटक मंडळ या व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश असणार आहे.
  8.  शाळा प्रमुखांनी सर्वेक्षणाच्या दिवशी सकाळी आपल्या सर्व स्टाफ सह शाळेच्या वेळेत शाळेमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  9. विद्यार्थी सर्व विषयासाठी  एकाच बाकावर विद्यार्थी बसेल अशी बैठव्यवस्था करावी. 
  10. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेची मूळ माध्यम असलेल्या  वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक निवड पद्धतीने निवडले जाईल.
  11. चाचणीसाठी जास्तीत जास्त 30 विद्यार्थी निवड नमुना randam निवड पद्धतीने सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील. 
  12. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी 30 विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही. 
  13. सर्वेक्षणासाठी निवड केलेल्या शाळांमध्ये निवड केलेल्या वर्गाचे सर्व  विद्यार्थी सर्वेक्षणाच्या दिवशी शंभर टक्के उपस्थित राहतील याबाबत सूचना कराव्यात.
  14. क्षेत्रीय अन्वेषक यांना आवश्यक ती माहिती वेळेस उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे. 
  15. सर्वेक्षण दिवशी सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षत्रिय अन्वेक्षण उपस्थित राहून नमुना आणि पद्धतीची प्रक्रिया संपवून वेळेच सर्वेक्षण पार पाडले जाईल.  निवडलेल्या विद्यार्थ्यांना SLAS आयडी देऊन बैठक व्यवस्था करतील .
  16. विद्यार्थी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक चाचणी च्या उत्तराची प्रतिसाद ओ एम आर सीटवर नोंदवणार आहेत. 

सर्वेक्षणासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून सर्व शाळांनी खालील माहिती तयार ठेवावी

  1. शाळा यु डायस 
  2. विद्यार्थी हजेरी पत्रक 
  3. इयत्ता निहाय पट 
  4. मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी 
  5. कार्यरत  शिक्षक यादी व भ्रमणध्वनी ,मेल आयडी 
  6. शाळा माध्यम 
  7. इयत्ता व तुकडी संख्या
  8. शाळा व्यवस्थापन प्रकार 
  9. ग्रामीण व शहरी

विद्यार्थी माहिती खालील नमुन्यात तयार ठेवावी.

क्षेत्रीय अन्वेषण ( एफ आय) यांच्यासाठी द्यावयाच्या सूचना 

      क्षेत्रीय अन्वेषक  प्रस्तुत  सर्वेक्षणासाठी एक जबाबदार घटक असेल. ज्याने संपूर्ण सतर्कता आणि वैयक्तिक लक्ष देऊन सर्वेक्षण संबंधित खालील कार्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्याचे आहेत.
  1. प्रत्येक क्षत्रिय अन्वेषक सर्वेक्षणाच्या दिवशी पूर्ण वेळ उपस्थित असेल .
  2. प्रत्येक क्षत्रिय सर्वेक्षण चाचणीच्या दिवशी तसेच अगोदरच्या दिवशी तालुका व जिल्हा स्तरावर यंत्रणेच्या संपर्कात राहील. वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार सर्वेक्षण प्रशिक्षण व इतर अनुषंगिक कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करेल.
  3. सर्वेक्षणासाठी कोणती शाळा दिलेली आहे याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था किंवा प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांचे कडून  प्रशिक्षण साहित्य, नियुक्ती आदेश व सर्व सूचनाबाबत अद्यावत राहतील.
  4. क्षेत्रीय अन्वेषक नेमून दिलेल्या शाळेवर  वेळेवर हजर राहून मुख्याध्यापकास रिपोर्टिंग करतील व सर्वेक्षण विषयक कामकाजात सुरुवात करतील.
  5.  सर्वेक्षण अंमलबजावणीसाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार नियुक्त नमुना शाळेत वेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहतील.
  6.  पूर्वनियोजित प्रक्रियेनुसार आवश्यकता भासल्यास रँडम संपलिंग पद्धतीने वर्गाच्या तुकडीची निवड करतील.
  7. पूर्व निर्धारित सूचनेनुसार वर्गातील विद्यार्थी 30 पेक्षा अधिक असतील तर नमुना निवड करतील.
  8. निवड केलेल्या वर्गातील पटावरील एकूण विद्यार्थ्या संख्या आणि प्रत्यक्ष चाचणीच्या  दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांच्या याबाबत पडताळणी करतील.
  9. क्षेत्रीय अन्वेषण ओ एम आर सीट भरणे बाबतचे प्रात्यक्षिक  करून दाखवतील व  ओएमआर वरील प्राथमिक माहिती भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करतील अथवा भरण्यासाठी आवश्यक्य सूचना देतील जसे की ओ एम आर खराब न करणे , घडी न पाडू देणे इत्यादी .
  10. दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार गोपनीय साहित्य उघडतील. 
  11. निवडलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचनानुसार व विहित कार्यपद्धतीनुसार चाचणी पुस्तिका क्रमाने वितरित करतील .
  12. अनुचित प्रकार निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतील
  13. इयत्ता तिसरी ओ एम आर सीट वरील प्राथमिक माहिती  शिक्षकांनी भरावी. मात्र उत्तराची पर्याय विद्यार्थ्यांस भरावयास सांगणे. आवश्यक्य तेथे मदत करावी मात्र उत्तरांची पर्याय सांगू नयेत.
  14. सूचनांपर बाबत काही प्रश्न असल्यास विद्यार्थ्यांना हात वर करण्यास सांगतील. 
  15. परीक्षा केंद्रात शांतता राखतील .
  16. क्षेत्रीय अन्वेषण ओ एम आर सीट गोळा करून त्यांची अचूक मोजणी करतील. उत्तर पत्रिका पॅकिंग व इतर अन्य मार्गदर्शक साहित्य सूचनानुसार सीलबंद करतील. कोणतेही साहित्य विद्यार्थ्यांकडे, वर्गात राहणार नाही याची काळजी घेतील.
  17. कागदपत्रे ,साहित्याची पॅकिंग आणि सिलिंग करताना पाकिटावरील संबंधित माहिती काळजीपूर्वक भरतील जसे की Udise नंबर, पाकिटावर सर्वेक्षणासाठी सर्व आवश्यक नोंदी इत्यादी बाबी नोंद होतील.
  18. सर्वेक्षणाची कोणतेही साहित्य सर्वेक्षणानंतर विद्यार्थी, शिक्षक किंवा मुख्याध्यापकांचे कडे राहणार नाही याची खात्री करून सर्व साहित्य जमा करतील. चाचणी पूर्ण झाल्यानंतर सर्व सर्वेक्षण साहित्य पूर्णत आलेल्या पाकिटामध्ये तालुका समन्वयक, जिल्हा समन्वयक यांचे कडे सोपवतील .
  19. या कामी तालुका व जिल्हा स्तरा वरील समन्वयक  यांच्याशी योग्य तो समन्वय साधून, राखून सर्वेक्षण यशस्वी  पूर्ण करावे .
  20. क्षेत्रीय अन्वेषक तालुका समन्वयक  यांना सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेच्या प्रत्यक्ष   पट व सर्वेक्षणासाठी निवडलेले विद्यार्थी संख्या यांची माहिती तालुका समन्वयक यांनी सर्वेक्षणाच्या दिवशी देतील.

सविस्तर पाने खालील परिपत्रक वाचा... 

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×