1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

VIDYARTHI VIGYAN MANTHAN VVM - इ. 6वी ते 11 वीतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मंथन परीक्षा सुवर्णसंधी

VIDYARTHI VIGYAN MANTHAN -  विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'विद्यार्थी विज्ञान मंथन' ही परीक्षा दरवर्षी इ. सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, निरीक्षण आणि तर्काच्या आधारावर विश्लेषण करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी तसेच आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या भरीव योगदानाबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी ही या परीक्षेची उद्दिष्टे आहेत.

VIDYARTHI VIGYAN MANTHAN -  विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा

VIDYARTHI VIGYAN MANTHAN -  विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा
VIDYARTHI VIGYAN MANTHAN
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा

विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एनसीईआरटी  यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा दरवर्षी इ. 6 वी ते 11 वी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. नवभारत निर्मितीसाठी ई. सहावी ते अकरावीमधील विद्यार्थ्यासाठी घेतली जाणारी सर्वात मोठी विज्ञान प्रज्ञा शोध VIDYARTHI VIGYAN MANTHAN - विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा

भारतीय वैज्ञानिकांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि त्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या वर्षी थोर भारतीय वैज्ञानिक, नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रमण यांची जीवनगाथा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी असणार आहे. भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रमण यांचे चरित्र, 'भारताचे विज्ञान-विश्वातील योगदान आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान' हा विशेष अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध होईल.

VIDYARTHI VIGYAN MANTHAN PARIKSHA नोंदणी प्रक्रिया व परीक्षेचे स्वरूप

  • सहावी ते अकरावीमधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.

  • मुख्य परीक्षा २७ नोव्हेंबर २०२२ (रविवार) आणि ३० नोव्हेंबर २०२२ (बुधवार) या दिवशी होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी आपल्या घरून अथवा शाळेमधून मोबाईलद्वारे (अँड्रॉइड) परीक्षा द्यायची आहे.
  • परीक्षेचा कालावधी हा दीड तास (९० मिनिटे) असणार आहे.
  • सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत मोबाईलवर परीक्षेच्या अँपवर लॉगिन करून कोणत्याही वेळी दीड तासामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.
  • मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना देणे सोपे व्हावे म्हणून चाचणी परीक्षा (मॉक टेस्ट) दि. १ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत.
  • मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच अन्य १२ भारतीय भाषांमध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना या भाषांपैकी कोणत्याही भाषेत परीक्षा देता येईल.
  • मुख्य परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असून या मध्ये १०० प्रश्न (१०० गुण) विचारले जातील.
  • विभाग अ मध्ये भारताचे विज्ञानातील योगदान, भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रमण यांची जीवनगाथा आणि 'भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान' यावर आधारित ४० प्रश्न विचारले जातील.
  • विभाग अ हा ४० गुणांचा असून यासाठी वेळ ३० मिनिटे असणार आहे.
  • विभाग ब मध्ये विद्यार्थ्यांच्या विज्ञान व गणित या शालेय अभ्यासक्रमातील विषयांवर आधारित ५० प्रश्न (५० गुण) आणि सामान्य तर्कशास्त्रावर आधारित १० प्रश्न (१० गुण) विचारण्यात येतील.
  • विभाग ब हा एकूण ६० गुणांचा असून यासाठी वेळ ६० मिनिटे असणार आहे. जर विभाग अ मध्ये विद्यार्थ्यास २० गुण किंवा अधिक गुण मिळाले तरच विभाग ब चे मूल्यांकन करण्यात येईल.
  • राज्यातील सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील २० विद्यार्थी हे राज्यस्तरीय शिबिरासाठी (State Level Camp) पात्र ठरतील. तसेच राज्यस्तरीय शिबिरामध्ये सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील २ विद्यार्थी हे राष्ट्रीय शिबिरासाठी (National Camp) पात्र ठरतील.
  • राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन हे रविवार ८, १५ किंवा २२ जानेवारी २०२३ (यादिवसांपैकी कोणत्याही एक दिवशी) तर राष्ट्रीय शिबीराचे आयोजन हे २० आणि २१ मे २०२३ यादिवशी करण्यात येणार आहे.
  • राज्य स्तरीय शिबीर आणि राष्ट्रीय शिबीर हे प्रयोग क्रिया, निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता, परिस्थितीजन्य समस्येचे निराकरण करण्याची क्षमता, सर्जनशीलता, नेतृत्वगुण इ. घटकांवर आधारित असेल. या शिबिरांची विस्तृत माहिती मुख्य परीक्षेनंतर देण्यात येईल.

विद्यार्थी विज्ञान मंथन - VVM VIDYARTHI VIGYAN MANTHAN परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये

१) राष्ट्रव्यापी महाप्रयोग - या वर्षी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहारशास्त्र आणि पर्यावरण या संकल्पनेवर आधारित एका महाप्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रयोगात विद्यार्थी स्वताच्या दैनदिन भोजनामध्ये समाविष्ट असणाऱ्या अन्न पदार्थांचे पोषणमूल्य आणि त्याचा पर्यावरणावर होणार परिणाम यावर प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आधारे अनुमान मांडणार आहेत. आपल्या घरूनच विद्यार्थी या प्रयोगामध्ये सहभागी होतील. प्रयोगाची माहिती नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल 
२) सृजन प्रशिक्षण कार्यक्रम - या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील नामवंत संशोधन संस्थांमध्ये (ISRO DRDO CSIR BARC) स्वतः भेट देऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी साधारण १ ते ३ आठवडे असा असणार आहे.
३) भास्कर शिष्यवृत्ती  - भास्कर शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय विजेत्यांसाठी आहे. एक वर्षासाठी रु. २००० प्रति महिना असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. सृजन प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय विजेत्यांना एखादा प्रकल्प नेमून देण्यात येईल आणि त्या प्रकल्पाचे विषय तज्ज्ञांकडून मूल्यांकन केले जाईल, या मूल्यांकनानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.
४) रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र - राष्ट्रीय, क्षेत्रीय व राज्य स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
सध्या परीक्षेसाठी नोंदणी चालू आहे. नोंदणीची प्रक्रिया (Registration) अत्यंत सोपी असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरच वैयक्तिकरित्या नोंदणी (Individual Registration) अथवा शाळेच्या माध्यमातून नोंदणी (Through School Registration) करता येईल. 


  • संस्थेमार्फत नोंदणीसाठी रु. २००/-शुल्क ठेवण्यात आलेले आहे.
  • नावनोंदणीचा अंतिम दि. २० ऑक्टोबर २०२२ आहे.
  • नोंदणीसाठी व अधिक महितीसाठी https://vvm.org.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी.

REGISTER

Note : Only school/institute principal/teacher can register as school

VVM is a national program for popularizing science among school students of standard VI to XI, conceptualized to identify the bright minds with a scientific aptitude among the student community. VVM is India’s largest science talent search examination for new India using digital devices as well as India’s first open book exam.

VVM विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा शासन परिपत्रक डाउनलोड करा.
VIDYARTHI VIGYAN MANTHAN VVM - Register as Individual student
VIDYARTHI VIGYAN MANTHAN VVM - Register As School


www.schooledutech.co.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×