1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांना गुगल कडून 5 लाख रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी | Doodle for Google Competition 2022

गुगल कडून भारतीय विद्यार्थ्यांना 5 लाख रुपये जिंकण्याची संधी | Doodle for Google Competition 2022 गुगल द्वारे भारत देश्यातील  इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीच्या सहभागी होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी गुगल डूडल (Doodle 4 Google Competition) तयार करण्याची स्पर्धा (Doodle for Google Competition) आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे Doodle for Google ही स्पर्धा इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीच्या सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना 5. लाख रुपये  व इतर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी  Doodle for Google Competition 2022 ची संपूर्ण माहिती मराठीत सोप्या पद्धतीने दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी अवश्य गुगल डूडल स्पर्धा नक्की समजून घ्या आणि आपल्या मित्रांना देखील ही माहिती शेयर करायला विसरू नका doodle-for-google-competition...

डूडल फॉर गुगल स्पर्धा | Doodle for Google Competition 2022

गुगल डूडल विजेत्या स्पर्धकास किती व कोणते बक्षीस मिळणार? Doodle for Google Prizes

गुगल या कंपनी कडून राष्ट्रीय विजेत्या स्पर्धकास (National Winner)  रक्कम  रुपये 5 लाख मात्र तर स्पर्धक असलेल्या शाळांना रक्कम  रुपये 2 लाख मात्र बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेतील 4 गट विजेत्यांना रक्कम  रुपये 2 लाख मात्र बक्षीस तर स्पर्धक गटातील शाळांना रक्कम  रुपये 2 लाख मात्र बक्षीस मिळणार आहे. 
त्या सोबतच डूडल विजेत्या स्पर्धकास गुगलकडून प्रमाणपत्र व ट्रॉफी (Certificate / Trophy of achievement),  गुगलचे हार्डवेअर (Google hardware) , Fun Google schwag इ. बक्षिसे गुगलकडून देण्यात येणार आहे. तसेच २० स्पर्धकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी (Certificate / Trophy of achievement), Fun Google schwag इ. बक्षिसे गुगलकडून देण्यात येणार आहे.


या वर्षी गुगल डूडल ची या स्पर्धेची थीम काय आहे? | This year’s Doodle for Google theme 2022

या स्पर्धेची थीम ही This year’s Doodle for Google theme is - In the next 25 years, my India will… या प्रमाणे आहे. या विषयाशी निगडीत  इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना गुगल डूडल तयार करायचे आहे. विषयाचा मराठी अर्थ असा आहे, येणाऱ्या २५ वर्षात माझा भारत देश असा असेल. याविषयीचे स्पर्धकांना चित्र काढायचे आहे. चित्र काढताना Google या लोगो मध्ये विषयानुसार चित्र काढायचे आहे. 
This year’s Doodle for Google theme is "In the next 25 years, my India will…"

थोडक्यात जाणून घ्या गुगल डूडल काय आहे? | What is Google Doodle

गुगल डूडल हे एक आकर्षक, मजेदार  (Fun creative picture) आणि सर्जनशील (कल्पकता व नाविन्यता) असणारे Google या शब्दामध्ये ते रेखाटलेले विषयानुरूप चित्र असते. गुगल डूडल हे चित्र गुगल द्वारे गुगल सर्च इंजिन लोगो मध्ये ठेवले जाते. वर्षभरातील अनेकदा दिनविशेष दिवशी, प्रसिद्ध कलाकार, व्यक्ती, शास्रज्ञ किंवा सुट्टीच्या दिवशी गुगल सर्च इंजिन लोगो मध्ये गुगल डूडल हे आपल्याला पहायला मिळते.

थोडक्यात जाणून घ्या गुगल डूडल कसे तयार करावे?

गुगल डूडल या स्पर्धेमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या कल्पकतेचा सर्जनशील विचार करून गुगल डूडल तयार करायचे आहे. यामध्ये स्पर्धक विद्यार्थ्यांना आपल्या पालकांची किंवा शिक्षकांची मदत घेता येणार आहे. "येणाऱ्या २५ वर्षात माझा भारत देश असा असेल" (In the next 25 years, my India will) या विषयावर स्पर्धक विद्यार्थ्यांनी सर्जनशील विचार करून आपल्या कल्पकता व नाविन्याचा विचार करायचा आहे. आणि भविष्याचा विचार करण्यासाठी पालक व शिक्षकांनी मदत करणे आणि Google या लोगो मध्ये चित्र काढण्याचा सराव करायचा आणि ३० सप्टेंबर पूर्वी आपले अंतिम चित्र गुगल डूडल सबमिट करायचे आहे.

थोडक्यात जाणून घ्या गुगल डूडल विजेत्या स्पर्धकाचे डूडल हे गुगल कधी लोगो मध्ये ठेवणार?

डूडल फॉर गुगल स्पर्धा विजेत्या स्पर्धकाचे गुगल डूडल हे १४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपूर्ण दिवस (२४ तास) गुगल लोगो मध्ये डूडल फॉर गुगल स्पर्धा विजेत्या स्पर्धकाचे गुगल डूडल आपल्याला पाहायला मिळेल. (your artwork displayed for a day (24 hours) on Google.co.in on November 14th, 2022)


थोडक्यात जाणून घ्या गुगल डूडल कोठे सबमिट करावे?

डूडल फॉर गुगल स्पर्धेतील स्पर्धकाचे गुगल डूडल "येणाऱ्या २५ वर्षात माझा भारत देश असा असेल" (In the next 25 years, my India will) या विषयावर काढलेले  गुगल डूडल हे ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी https://doodles.google.com/intl/ALL_in/d4g/enter/ या गुगलच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. त्याचप्रमाणे डूडल फॉर गुगल स्पर्धेकरिता महत्वाच्या लिंक पुढे दिलेल्या आहेत.

थोडक्यात जाणून घ्या गुगल डूडल स्पर्धेत कधी सहभागी व्हावे? 

५ ऑगस्ट पासून गुगल डूडल  (Doodle for Google) ही स्पर्धा सुरु झालेली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडे अजूनही संधी उपलब्द असून अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. (Doodle for Google participants is 5th August 2022 and the closing date for receipt of entries by Google is extended to 30th September 2022)



गुगल डूडल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महत्वाच्या लिंक्स


  1. यापूर्वीचे मागील गुगल डूडल पाहण्यासाठी  येथे स्पर्श करा.
  2. गुगल डूडल स्पर्धा नियम Contest Rules वाचण्यासाठी  येथे स्पर्श करा.
  3. गुगल डूडल स्पर्धा Submission form Download करण्यासाठी येथे स्पर्श करा. 
  4. गुगल डूडल स्पर्धा Prizes वाचण्यासाठी  येथे स्पर्श करा.
  5. गुगल डूडल तयार करण्यासाठीचे  Videos (Educator Resources) येथे पहा.
  6. गुगल डूडल फॉर्म व तयार केलेले  डूडल येथे अपलोड करा.

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

💢




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×