-->
1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24

सर्वच शिक्षकांची होणार शिक्षक प्रेरणा परीक्षा? आदेश जारी! | Shikshak Prerna Pariksha

 Shikshak Prerna Pariksha:  विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद येथील विकास शाखेच्या वतीने औरंगाबाद विभाग अंतर्गत येणाऱ्या  शाळांच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे Shikshak Prerna Pariksha आयोजन करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे

शिक्षकांची होणार शिक्षक प्रेरणा परीक्षा; आदेश जारी! | Shikshak Prerna Pariksha

जिल्ह्यातील शिक्षकांची होणार परीक्षा; आयुक्तांचे आदेश जारी! जिल्हाधिकारी परीक्षा नियंत्रण समितीचे अध्यक्ष | Teacher Prerna  Exam

Teacher Prerna  Exam  बाबत असे की, या परीक्षेसंदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची 13 डिसेंबर 2022 रोजी  विभागीय आयुक्त कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध शिक्षक संघटनाने आपली भूमिका विषद करत Shikshak Prerna  Exam साठी अनुमोदन दिले आहे. 

Purpose of Teacher Prerna  Pariksha | शिक्षक प्रेरणा परीक्षेचे हेतू पुढील प्रमाणे आहेत.

  • शिक्षकांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, 
  • शिक्षकांना  स्वयं अध्ययनाची गोडी लागावी.
  • विषय ज्ञानात वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी.
  • स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी.
  • विद्यार्थ्यांना चौफेर अद्यावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी. या हेतूने शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यात येणार आहेत.

परीक्षा नियंत्रण समिती

Shikshak Prerna  Pariksha च्या यशस्वितेकरीता विभाग आणि जिल्हा स्तरावर परीक्षा नियंत्रण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. यानुसार विभाग स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे परीक्षा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष असणार आहेत. विभागस्तरावर प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार असून त्या सीलबंद स्वरूपात जिल्हा परीक्षा नियंत्रण समितीकडे  सुपूर्द करण्याचे काम विभागीस्तरीय परीक्षा नियंत्रण समितीकडून केले जाणार आहेत.

विभागीय परीक्षा संनियंत्रण समिती :-

अध्यक्ष विभागीय आयुक्त
सदस्य सचिव संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद
सदस्य उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद
सदस्य विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग
सदस्य विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग

विभागस्तरीय संनियंत्रण समितीचे कर्तव्ये व जबाबदाऱ्या :-

1. प्रश्नपत्रिका तयार करणे व प्रश्नपत्रिकेची प्रत सीलबंद स्वरूपात जिल्हा परीक्षा संनियंत्रण समितीस सुपूर्द करणे.
2. समिती सदस्यांनी विभागीय आयुक्त यांचे मान्यतेने जिल्ह्यांना पत्रव्यवहार करणे,

जिल्हास्तरीय परीक्षा सनियंत्रण समिती :- 

अध्यक्ष जिल्हाधिकारी
सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)
सदस्य अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सदस्य प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 
सदस्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रति, जिल्हा परिषद
सदस्य प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

आर्थिक नियोजन समिती (जिल्हा स्तर) : 

अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सदस्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद
सदस्य लेखाधिकारी वर्ग-1 वित्त विभाग, जिल्हा परिषद
सदस्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

आर्थिक नियोजन समितीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या :-

प्रस्तुत परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, ओएमआर मशिनवर उत्तरपत्रिका तपासणी व उत्तीर्ण परीक्षार्थीसाठी प्रमाणपत्र छपाई, बक्षीसवस्तु व इतर अनुषंगीक बार्बीवर येणाऱ्या खर्चाचे आर्थिक नियोजन करणे.

प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, सिलिंग, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांसाठी कस्टडी रूम इ.

उपरोक्त बाबीची जबाबदारी खालील समितीवर सोपवावी.
अध्यक्ष अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद .
सदस्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 
सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

महत्वाच्या ठळक बाबी Teacher Prerna Exam

  • ही शिक्षक प्रेरणा परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची आहे.
  • शिक्षक प्रेरणा परीक्षेत औरंगाबाद विभागातील अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळातील शिक्षकांसाठी ही परीक्षा असेल.
  • ही परीक्षा शिक्षकांना विषयज्ञानात पारंगत करून त्यांचे विषय ज्ञान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने घेण्यात येत आहे.
  • या परीक्षेचा शिक्षकांच्या सेवाविषयक बाबीवर कुठलाही परिणाम होणार नाही.
  • परीक्षेस बसण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची यादी केली जाईल तशाच प्रकारे इच्छुक नसणाऱ्या शिक्षकांची यादीही करून त्यांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे.
  • शिक्षक प्रेरणा परीक्षासाठीचा वेळ व दिनांक हा आपल्या विभागात  एकच असेल.
  • परीक्षेच्या दिनांक व वेळ, विहित प्रपत्रे, पेपर तपासणीचा दिनांक याविषयी स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे.

शिक्षक प्रेरणा परीक्षेचे स्वरूप Nature Of Teacher Prerna Exam

  • प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 50 प्रश्न असलेली वस्तुनिष्ठ स्वरूपाची 50 गुणांची असेल म्हणजेच प्रत्येक प्रश्नाचे 01 गुण दिला जाणार आहे.
  • शिक्षक प्रेरणा परीक्षासाठी निगेटिव्ह मार्किंग लागू असणार आहे 
  • प्रत्येक चुकीच्या एका उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील.
  • परीक्षेमध्ये अंतिम गुणाचे आधारे एकूण गुणांपैकी 50 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या शिक्षकास उत्तीर्ण ठरविण्यात येणार आहे.
  • अंतिम निकाल तयार झाल्यानंतर जिल्हास्तरावर गुणानुकमे प्रथम येणाऱ्या 50 परिक्षार्थीची नावे, उत्तीर्ण परिक्षार्थींची नावे व एकूण निकाल जिल्हास्तरावर घोषित करण्यात येणार आहे.
  • गुणाानुक्रमे जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थींना सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी अभ्यासक्रम Teacher Prerna Exam Syllabus

इ. 5 वी ते 12 वी पर्यंतच्या SCERT / NCERT पाठ्य पुस्तकांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र इ. विषयासंबंधीचा अभ्यासक्रम राहील.

उपरोक्त प्रमाणे सर्व संबंधितांनी परीक्षेचे नियोजन करावे. तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणावा. परीक्षेची दिनांक व वेळ ही स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

परीक्षेची गोपनीयता व दर्जा राखण्याची जबाबदारी ही सर्व संबंधित जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प यांची राहील. केलेल्या नियोजनास बाधा न पोहचता सर्व संबंधित जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प हे आपल्या कल्पकेची भर घालुन परीक्षा या अधिक सुरळीत व आनंददायी वातावरणात पार पाडणेस सक्षम राहतील..


शिक्षक प्रेरणा परीक्षा Teacher Prerna  Exam  👉   आदेश - परिपत्रक pdf  पहा 

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

-शिक्षक-प्रेरणा-परीक्षा

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.