मुक्त शिक्षण - 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना 17 नंबरचा from भरून थेट परीक्षा देण्याची संधी असते. मात्र, आता 3री, 5वी व 8वी, 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये एक दिवस सुद्धा न जाता परीक्षा देण्याची संधी ‘मुक्त’ शिक्षणाची द्वारे उपलब्ध होणार आहे…
शाळेत न जाता देता येणार थेट परीक्षा! तिसरी, पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांना ‘मुक्त’ शिक्षणाची संधी
मुक्त शिक्षण - काही मुलांना घराच्या किंवा इतर अडचणींमुळे शाळेत जाता येत नाही, अशा शाळेत न जाता येणाऱ्या मुलांकरिता मुक्त व दूरस्थ शिक्षणाची संधी मिळणार असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला असून त्याची धोरणाची अंमलबजावणी आता करण्यात येणार आहे.
शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्यां विद्यार्थ्यांपैकी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी 5वीनंतर आणि विशेषत: 8वीनंतर शाळा सोडल्याचेे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ‘एनएसएसओ’तर्फे सन २०१७-२०१८ मध्ये करण्यात आलेल्या ७५व्या फेरीतील घरगुती सर्वेक्षणाप्रमाणे ६ ते १७ वयोगटामधील शाळाबाह्य मुलांची संख्या तब्बल ३ कोटी २२ लाखांपर्यंत होती.
या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून साल २०३० पर्यंत शालापूर्व ते माध्यमिक स्तरापर्यंत १००% शाळा नोंदणी गुणोत्तराचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी करण्याची गरज व्यक्त करण्यात आलेली होती. भारतातील सर्वच मुलांना शालापूर्व ते इयत्ता 12वीपर्यंतच्या व्यावसायिक शिक्षणाबरोबरच गुणवत्तापूर्ण सर्वांगिण सार्वत्रिक शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करण्याकरिता आणि तशी संधी देण्याकरिता देशव्यापी प्रयत्न करण्यात येणार असून त्याकरिता प्राधान्याने दोन उपक्रम राबविले जाणार आहेत.
मुलांची शाळाबाह्य गळती थांबण्यासाठी दोन उपक्रम खालील प्रमाणे
- पहिला उपक्रम : पुरेशा मूलभूत सुविधा पुरवणे: विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शाळा ते 12वीपर्यंतच्या सर्वच स्तरावर सुरक्षित शिक्षण मिळेल. शिवाय, प्रत्येक स्तरावर प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होतील. आवश्यकतेच्या ठिकाणी नवीन शाळेची उभारणी व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, वाहतूक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
- दुसरा उपक्रम : विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षण स्तरा काटेकोर काळजीपूर्वक लक्ष देवून शाळेमध्ये सार्वत्रिक सहभाग वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येईल. जेणेकरून विद्यार्थ्यानी शाळेत प्रवेश घेतला आणि ते मागे पडल्यास अथवा शाळा सोडल्यास पुन्हा अभ्यासाची झीज भरून काढण्यासाठी व शाळेमध्ये परत प्रवेश घेण्याची संधी देण्यात येईल. १८ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना मूलभूत स्तर आणि इयत्ता 12वीपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता योग्य त्या सुविधा यंत्रणा उभारण्यात येणार आहेत.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी ‘मुक्त व दूरस्थ’ पर्याय:
शाळेत प्रत्यक्षपणे उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयीच्या गरजा भागविण्याकरिता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOOS) व स्टेट ओपन स्कुलिंग यांचे ‘मुक्त व दूरस्थ’ शिक्षण कार्यक्रम म्हणजेच ओपन ॲण्ड डिस्टन्स लर्निंग राबवण्यात येणार असून औपचारिकरित्या शाळा प्रणालीच्या इयत्ता 3री, 5वी व 8वीच्या समानकक्ष असून इयत्ता 10वी, 12वीच्या समानकक्ष असलेले माध्यमिक शिक्षण कार्यक्रम, व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम, प्रौढ साक्षरता आणि जीवन समृद्धी कार्यक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे.
शाळेत-न-जाता-देता-येणार-थेट-परीक्षा-तिसरी-पाचवी-आठवीतील-विद्यार्थ्यांना-मुक्त-शिक्षणाची-संधी-मुक्त शिक्षण