विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students
![]() |
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार Webinar organized for career guidance to students |
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार विषयाच्या अनुषंगाने आपणा सर्वाना विदित आहेच की राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअर च्या विविध संधी, आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालया मार्फत खालील लिंकवरून करण्यात येणार आहे.
Timetable of Webinar organized for career guidance to students
दिनांक | वेळ | विषय | वेबिनार लिंक |
---|---|---|---|
१७ जून २०२२ | दुपारी ३ ते ४ | करिअर निवडताना | Join Webinar Now |
२४ जून २०२२ | दुपारी ३ ते ४ | आपले व्यक्तिमत्व आणि करिअर निवड | Join Webinar Now |
१ जुलै २०२२ | दुपारी ३ ते ४ | सद्यस्थितीतील आव्हाने आणि करिअर निवड | Join Webinar Now |
८ जुलै २०२२ | दुपारी ३ ते ४ | इयत्ता १० वी नंतरच्या करिअर संधी व प्रवेश परीक्षा | Join Webinar Now |
२२ जुलै २०२२ | दुपारी ३ ते ४ | इयत्ता १२ वी नंतरच्या परीक्षा | Join Webinar Now |
१९ ऑगस्ट २०२२ | दुपारी ३ ते ४ | बॅकिंग क्षेत्रातील करिअर | Join Webinar Now |
१६ सप्टेंबर २०२२ | दुपारी ३ ते ४ | सेवा क्षेत्रातील करिअर | Join Webinar Now |
२३ सप्टेंबर २०२२ | दुपारी ३ ते ४ | प्रसार क्षेत्रातील करिअर | Join Webinar Now |
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला उपस्थित रहावे.
Please do not enter any spam link in the comment box.