1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

Cluster School Project In Maharashtra क्लस्टर शाळा म्हणजे काय?

राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची फक्त शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर, सर्वांगीण विकास यात राहणारी कमतरता हा मुद्दा देखील शालेय शिक्षण विभागाने ऐरणीवर आणला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात ‘क्लस्टर शाळा’ हा एक अभिनव प्रयोग राबविला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या 4 हजार 895 शाळा त्यासाठी विचारात घेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन होऊन त्यांना आपले शिक्षण सहजगत्या मिळणार आहे.

Cluster School Project In Maharashtra

राज्यातील 4,895 शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार एकत्रीकरण!

राज्यभरात 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 4 हजार 895 शाळा आहेत, त्या शाळांमध्ये 8 हजार 226 शिक्षक आहेत, तर सुमारे 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

क्लस्टर शाळा म्हणजे काय?

अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी एक शाळा म्हणजे ‘क्लस्टर शाळा.’ कमी पटसंख्येच्या शाळा असलेल्या भागातील काही अंतरावरील एक मध्यवर्ती शाळा निवडून त्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. पुणे जिल्ह्यातील पानसेत जवळ क्लस्टर शाळेचा राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला आणि तो 100 टक्के यशस्वी झाला.

क्लस्टर स्कूल प्रकल्प Cluster School Project In Maharashtra

महाराष्ट्रात आता क्लस्टर स्कूल प्रकल्प Cluster School Project In Maharashtra राबविण्यात येणार आहे या क्लस्टर स्कूल प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत.

क्लस्टर स्कूल प्रकल्प Cluster School Project कुठे राबवला जाणार?

महाराष्ट्रातील 20 पेक्षा कमी पट संख्येच्या असणाऱ्या शाळांसाठी क्लस्टर स्कूल प्रकल्प Cluster School Project नवा प्रयोग राबवला जाणार आहे.माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय जाहीर केला. या ठिकाणी झालेल्या चर्चासत्रात शिक्षण आयुक्त श्री. सुरज मांढरे यांनी हा मुद्दा चर्चेत आणला होता. महाराष्ट्रात सुमारे 4500 हून अधिक शाळा 20 पेक्षा कमी पट संख्येच्या आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यासाठी क्लस्टर स्कूल हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

क्लस्टर स्कूल प्रकल्प Cluster School Project किती शाळांमध्ये राबविला जाणार?

महाराष्ट्रामध्ये 4895 शाळा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत या शाळांना शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या सुमारे 8226 इतकी प्रचंड आहे. सुमारे 50 हजार विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहे.या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेमध्ये कमी पटसंख्या हा एक अडथळा ठरत आहे अशी शिक्षण विभागाची धारणा आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला चांगला आकार देण्यासाठी हा प्रकल्प राबविला जावा अशी चर्चा ॲम्बी व्हॅली या ठिकाणी झालेल्या कार्यशाळेमध्ये झाली.

पानशेत येथे राबविला पथदर्शी प्रकल्प

क्लस्टर स्कूलचा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील पानशेजवळ वेल्हे तालुक्यात राबविण्यात येत आहे. पानशेतला यासाठी एक मोठी इमारत बांधण्यात आली आहे. 16 जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी या ठिकाणी बसने येणार आहेत. दोनपेक्षा जास्त किलोमीटर अंतरावरील विद्यार्थ्यांना बसची सुविधा राहणार आहे. 16 शाळांमध्ये जवळजवळ 37 शिक्षक आहेत. यापैकी 9 शिक्षकांची नियुक्ती या शाळेत केली जाणार आहे. 154 विद्यार्थी सुरुवातीला या शाळेमध्ये शिक्षण घेतील.याशिवाय काही तज्ञ शिक्षकांची नियुक्तीही या शाळेत केली जाईल. क्लस्टर स्कूल प्रकल्पाची अंमलबजावणी आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व्हावी असा विचार या निमित्ताने पुढे आला.

क्लस्टर स्कूल साठी सर्व शैक्षणिक सुविधांनी युक्त मोठी इमारत

क्लस्टर स्कूल साठी सर्व शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी बाराखड्यांची मोठी इमारत उभारली गेली आहे यामध्ये आठ वर्ग खोल्या आहेत.त्याचप्रमाणे एक प्रयोग शाळेसाठी संगणक कक्ष,विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम खोली,इ. वर्गखोली असणार आहे. सुरुवातीला या पथदर्शी उपक्रमास पालक आणि शिक्षकांचा विरोध होता परंतु या उपक्रमाचे फायदे लोकांना समजल्यानंतर याविषयी अनुकूल वातावरण तयार झाले.

क्लस्टर स्कूल म्हणजे काय? What is Cluster school?

अनेक विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी शाळा म्हणजे क्लस्टर स्कूल होय. एक मध्यवर्ती शाळा निवडून या भागातील ठराविक अंतरावरील शाळांतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. त्याचप्रमाणे सर्व आधुनिक पायाभूत भौतिक सुविधा एका ठिकाणी दिल्या जातील.

क्लस्टर स्कूलसाठी शासन विद्यार्थ्यांना प्रवास खर्च देणार का?

कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या क्लस्टर स्कूलमध्ये म्हणजेच मध्यवर्ती शाळेमध्ये येण्यासाठी प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी येणारा खर्च शासन उचलणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सरकारी निधीतून बस सेवा उपलब्ध करून देणारी पानशेत ही एकमेव आणि पहिली शाळा असणार आहे. त्यामुळे क्लस्टर स्कूल प्रवासखर्च विद्यार्थी व पालकांची आर्थिक कुचंबना होणार नाही.त्याचप्रमाणे दर्जेदार शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळेल. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 6000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. फोर्स मोटर्स कंपनीने CSR फंडातून यासाठी दोन बस उपलब्ध करून दिल्या आहेत.

कमी पटसंख्या असणाऱ्या शिक्षकांचे समायोजन कसे होणार?

20 पेक्षा कमी पटाच्या शाळांमधील शिक्षकांचे समायोजन क्लस्टर स्कूलमध्ये होईल. या शिक्षकांमधून क्लस्टर स्कूलमध्ये शिक्षक नियुक्त केले जातील.शिल्लक राहिलेल्या शिक्षकांचे समायोजनही इतर शाळांवर केले जाईल.

जगभरातील अनेक देशांमध्ये क्लस्टर स्कूल हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आलेला आहे. अनेक भागांमध्ये विशेषतः डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पोहोचणे कठीण असते. त्याचप्रमाणे या भागामध्ये असणारे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असते. परिणामी अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या अडचणी येतात. त्याचप्रमाणे शासनाचाही भरमसाठ खर्च होत असतो. क्लस्टर स्कूल प्रकल्प राबवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवासाची अडचण सोडवली जाणार असल्यामुळे या शाळांना पालकांमधून निश्चितच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ठेवली गेली आहे.

महाराष्ट्रात आता क्लस्टर स्कूल प्रकल्प Cluster School Project In Maharashtra पालकांकडून स्वागत होत आहे.

पानशेतमध्ये साकारतेय झेडपीची क्लस्टर स्कूल,सोळा शाळांचे एकत्रीकरण;राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प

पुणे जिल्हा परिषदेने एक चांगला पर्याय शोधून काढला आहे. हा पर्याय म्हणजे कमी पटाच्या शाळा बंद नव्हे तर, त्यांचे एकत्रीकरण करायचे, असा हा नवा पर्याय आहे. यालाच क्लस्टर स्कूल (समूह शाळा) असे नाव देण्यात आले आहे.

यानुसार झेडपीची राज्यातील पहिली क्लस्टर स्कूल ही पुणे जिल्ह्यातील पानशेत (ता. वेल्हे) येथे साकारत आहे. अशा पद्धतीचा हा राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प असणार आहे.

पानशेतमध्ये साकारतेय झेडपीची क्लस्टर स्कूल

पानशेतमध्ये 16 शाळेतील विद्यार्थी एकाच शाळेत शिकणार; शाळा एकत्रीकरणाचा राज्यातील पहिलाच प्रयोग

पुण्यातील जिल्ह्यात 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याऐवजी शाळा एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. वेल्हे तालुक्यातील पानशेत गावात ही शाळा उभारली असून लवकरच ग्रामीण भागातील विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी दाखल होणार आहे.

'शाळा एकत्रीकरणाला पालकांचा विरोध होता'

20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला पालकांंनी आणि विद्यार्थ्यांनी ग्रामीण पातळीवर आंदोलनं करत विरोध दर्शवला होता. शाळा बंद करु नका? नाही तर मुलांना शिक्षण कसं मिळेल? शाळा एकत्रीकरण केलं तर  ती शाळा गावापासून लांब असेल तर जाण्या-येण्याची सोय कशी केली जाणार?, असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले होते. त्यानंतर अनेक पालकांची समजूत काढून त्यांना शाळेचं आणि एकत्र शिक्षणाचं महत्व पटवून दिलं त्यानंतर पालकांनीही या शाळा एकत्रीकरणाला परवानगी दिली होती. 

'पुणे जिल्ह्यातील 1000 शाळा बंद होण्याची शक्यता'

महाराष्ट्रात आता क्लस्टर स्कूल प्रकल्प Cluster School Project In Maharashtra राबविण्यात येणार आहे या क्लस्टर स्कूल प्रकल्पाविषयी माहिती आपण या लेखात घेतली आहे.


प्रबोधन दूत योजना संपूर्ण माहिती  👉   शिक्षक नावनोंदणी

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

-क्लस्टर-स्कूल-म्हणजे-काय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.